Home बुलढाणा भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सव सभा संग्रामपूर येथे संपन्न!

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सव सभा संग्रामपूर येथे संपन्न!

123

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0005.jpg

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सव सभा संग्रामपूर येथे संपन्न!

संग्रामपुर तालुका विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपुर:- दिनांक 16 जून 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वा 2022 अंतर्गत तहसील कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल येथे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक तलाठी यांची सभा घेण्यात आली सभेचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे होते तर प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी संजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी साळवे, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार,व निवाण्याचे सरपंच हे होते. याप्रसंगी माननीय तहसीलदार साहेब यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या बद्दल माहिती सांगितली तसेच स्वतंत्र सैनिकांचे आजी-माजी सैनिकांचा मान सन्मान करण्याचे सांगून प्रत्येक गावाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्ती कक्ष उभारून येणाऱ्या संकटांना तोंड द्यावे असे सांगितले तसेच गौण खनिज च्या संदर्भात ग्राम दक्षता समितीचे कार्य व जबाबदारी सांगून रेती माफियांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले तसेच सरपंच व ग्रामसेवक आणि तलाठी यांना यांची जबाबदारी सांगितली याप्रसंगी पत्रकार प्रल्हाद दातार, व पळशी चे सरपंच, अभय पाटील मारोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर अशोक सरवदे यांनी केले

Previous articleपरिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा येथे शाळापूर्व मेळावा संपन्न
Next articleपी .आर .पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जनावराच्या लसीकरनासंदर्भात केले मार्गदर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.