Home नाशिक देवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

देवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

106
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0022.jpg

(भिला आहेर युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क)
देवळा:– कांदाभावात दररोज होणाऱ्या घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधून कष्टकरी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा ह्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांकडून देवळ्यात रास्तारोको.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस कांदा भावात होत असलेल्या घसरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे देखील मुश्किल झाले असून याकडे शासनाचे पुर्णतः दुर्लक्ष असून गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना ,कांदा उत्पादक संघटना व शेतकऱ्यांनी देवळा कळवण रस्त्यावर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांबाबत नेहमीच चुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत .महागडी कांदा बियाणे,वीज भारनियमन ,निसर्गाचा लहरीपणा,वाढती मजूरी ह्या सर्व संकटांवर मात करत व महागड्या औषधांची फवारणी करत शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याचे उत्पादन केले त्यातच उत्पन्नात किमान चाळीस टक्के घट आली आहे असे असतांनाच नाफेडची खरेदी सुरू असतांना देखील कांद्याच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली घसरण थांबतच नसल्याने तसेच कांद्याला किमान दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा,तसेच येथून मागे विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी संतप्त झालेल्या संघटना व शेतकरी यांनी हे रास्तारोको आंदोलन केले .
यानंतर तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, युवा तालुकाध्यक्ष तुषार शिरसाठ,प्रहारचे जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव,गोविंद पगार,कुबेर जाधव,स्वाभिमानाचे जिल्हाउपाध्यक्ष रवि शेवाळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष संजय जाधव,शरद शिलावट,धना शिरसाठ, बापू बोरसे,सतीश बोरसे,विष्णू जाधव,संजय दहिवडकर ,किरण मोरे,जयदीप भदाणे,राजेंद्र शिरसाठ, प्रकाश गरुड ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते,कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी यांसह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Previous articleवनमजूर, वनरक्षक तसेच वनपाल यांना वेळेवर मासिक वेतन मिळणार – रंगनाथ नाईकडे- मुख्य वनसंरक्षक
Next articleवरवट बकाल मध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन नमाज पठणाचा अर्थ समजावल्या गेले उपस्थितांना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here