राजेंद्र पाटील राऊत
विना परवाना देशी दारू अवैद्ध वाहतूक करतांना चार बॉक्स पकडले.
दुकान मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
I
73 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त .
संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- तालुक्यातील वरवट( बकाल) येथून विना परवाना दुचाकीने देशी दारू चे बॉक्स नेत असतांना दोघांना पकडले. त्यांच्याकडून चार बॉक्स देशी दारूसह 73 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन मजूर व दुकान मालकासह तिघांविरुद्ध तामगांव पो. स्टे,ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव यांच्या पथकाने आज दि. 30/ एप्रिल रोजी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त खामगाव यांना गोपनीय माहिती मिळाली की वरवट (बकाल) येथील देशी दारू दुकान मालक शैलेश जैस्वाल हा मजुरा कडून दुचाकीवर मजुरांकडून विनापरवाना देशी दारू तालुक्यात व शेजारील तालुक्यात पोहोचवण्याचे काम करतो. त्यावरून संग्रामपूर तालुक्यातील वरवट (बकाल) येथील सोनाळा रोड वरिल श्री नागेश्वर विद्यालय जवळ नाकाबंदी करून एका दुचाकी वाहनाची चौकशी केली असता त्यांच्या जवळून देशी दारूचे साडे चार बॉक्स 216 शिश्या किंमत 12 हजार 960 रु., होंडा ड्रीम युगा दुचाकी किंमत 60 हजार रुपये व एक जिओ मोबाईल किंमत 1000 रुपये आणि पोतडी असा एकूण 73 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सुधाकर गजानन धुंदळे वय 42 रा.कोलद, व सागर सुभाष भारसाकळे वय 32 रा.एकलारा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या बयाणा वरून वरवट (बकाल )येथील देशी दारू दुकान मालक शैलेष जयस्वाल यांच्याकडे आम्ही रोजंदारीने मजुरीने काम करीत असल्याचे सांगितले. त्यावरून खामगावअ.पो.अधिक्षक कार्यालयाचे गजानन दामोदर आहेर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन तामगाव पो.स्टे.ला आप क्र.119/2022 कलम 65(ई) म.दा.का.नुसार सुधाकर धुंदळे,रा.कोलद व सागर भारसाकळे रा.एकलारा हे दोन मजूर व दुकान मालक शैलेश जैस्वाल यांचे विरुद्धगुन्हा दाखल केला आहे,सदर कारवाई अप्पर पो.अधिक्षक पथकातील पंकज सपकाळ,गजानन बोरसे,गजानन आहेर,संदिप सपकाळ यांनी केली असून पुढील तपास तामगांव पोलीस.स्टेशन चे पोलीस हेड काॕ स्टेबल बीट जमदार कुसुंबे करीत आहेत.






