राजेंद्र पाटील राऊत
संपादकिय अग्रलेख…
“आग लावू तमाशा पाहू..! गावोगांवी नारदमुनीची औलाद वाढत आहे !
वाचकहो,
आपला महाराष्ट्र संस्कृतीप्रिय म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्रात आजवर अनेक गुरु शिष्याच्या जोडया नावारुपास आल्यात आणि गुरुनेही शिष्यांसाठी चांगले असेच ज्ञानदान करण्याबरोबरच योगदान दिल्याचाही इतिहास या महाराष्ट्राला आहे.
पण..सध्याची ही सगळी परपंरा मोडीत निघत चालली आहे,जो तो मतलबी युगात स्वार्थासाठी वाट्टेल ते छिनाल चाळे करीत सुटला आहे.यालाच मग नाईलाजास्तव म्हणावे लागत आहे की,गावोगावी नारदमुनीची औलाद वाढत चालली आहे.तसे बघितले तर आम्हांला आमच्या घरातच काय?पण गल्लीतही कवडीची किंमत नसते आणि आम्ही मात्र मोठमोठी स्वप्न गल्लीत बसून दिल्लीची बघत असतो! हा आमचा नादानपणाच नव्हे तर बालिशबुध्दी म्हटली पाहिजे.गावागावात वाढत चाललेली नारदमुनीची औलाद म्हणजे हा त्यातलाच एक प्रकार! आपण खातो काय?बोलतो काय ?याचेही साधे भान या कलियुगातील नारदांना राहिलेले नाही,त्यामुळेच कधी इकडची गोष्ट तिकडे करतो अशा अति उत्साहात असलेले हे गावागावातील नारद मात्र खरे अर्थाने लवकरच जनतेच्या लक्षात येतात.या नारदांचा एकमेव एक कलमी कार्यक्रम म्हणजे इकडे आग लावू तिकडे आग लावू आणि तमाशा पाहत राहू या प्रकारात जरी मोडत असली तरी आम्हीच किती शाजुक व लायकीदार आहोत हे दाखविण्यासाठी व स्वतः चा स्वार्थ मतलब साधून घेण्यासाठी आणि त्यावर आपली पोळी शेकून घेण्यासाठी धडपडत असतात.मात्र अश्याने कधीच प्रगती होत नाही किंवा असे हे नारदमुनी कधीच एका जागेवर एकनिष्ठ व प्रामाणिक राहून सुखी राहत नाहीत.शेवटी एखाद्या छिनाल व कुलटा बाईने गावभर पतिव्रता बाईच्या नावाचा डांगोरा पिटत फिरण्यासारखा हा प्रकार असतो.आताच्या या कलियुगात वाढत चाललेल्या नारदमुनीच्या औलादीना फक्त एवढीच उपमा देता येते की,वाचाळवीर किंवा वाचाळस्पती हिच यांची लायकी असते.हे कलियुगातले नारदमुनी विघातक प्रवृतीला निमंत्रण देणारेच ठरतात.त्यामुळेच आता समाजाने जागृत राहून अशा भामटया नारदांपासून सावध रहाणे केव्हाही चांगलेच ठरते.अन्यथा आजच्या नारदांच्या पंगतीला बसणा-यांचाही विनाश अटळ आहे ,हे मात्र निश्चित!देवादिकांच्या काळात असलेल्या नारदाने कळलाव्या म्हणून नावलौकिक मिळविण्यासोबतच चांगले कार्य करुन आपले नावही उज्वल केल्याचा इतिहास आहे.मात्र आताचे गावोगावी पैदा होत असलेले नारद नाव कमावणे तर दुरच..काढया करुन लोकांचे घरे उध्वस्त करण्याची कामे इमाने इतबारे करीत असल्याचे दृश्य स्वर्गातून नारदमुनीने बघितले तरी या नारदाच्या कृत्यावर पश्शातापच होत असेल.एव्हढे मात्र खरै!






