Home पुणे दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 55 टन वाहतुकीचा नवा विक्रम,

दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 55 टन वाहतुकीचा नवा विक्रम,

149

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी दौंड प्रशांत नागणे                       दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 55 टन वाहतुकीचा नवा विक्रम, महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे ऊस गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेतले जाते म्हणून ऊस पिकाचे आगर म्हणून महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याची ओळख कायम आहे साखर उत्पादन गाळप साखर उतारा याबाबत देखील जिल्ह्यातील साखर कारखाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत अशाप्रकारचे अनेक विक्रम साखर क्षेत्रात चालू असताना आज एक नवा विक्रम झाला असून तो म्हणजे एका ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूकदार शेतकऱ्याने ट्रॅक्टर मध्ये 25 नवे 40 नवे तब्बल 55 टन 180 किलो उसाची वाहतूक करून संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला सोशियल मीडिया वर हा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत असून हा विषय चर्चेचा विषय बनला आहे दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्री नाथ मस्कोबा साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणारे तुळापूर येथील अंकुश खंडू शिवले असे शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्या ऊस वाहतूक विक्रमाची नोंद जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात झाले आहे आज तागायत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंचेचाळीस टनापर्यंत ऐकले होते परंतु पंचावन्न टनाचा नवा विक्रम झालेला आहे उसाची 55 टन वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून कारखान्याच्या वजन काट्यावर उसासह वजन केलेले पावतीही ठेवण्यात आलेली आहे.

Previous articleवानखेड ग्रामस्थांना पिण्यासाठी होतोय विषारी पाण्याचा वाटप.
Next articleपाणी टंचाईच्या झळा; पाण्यासाठी दाहिदिशा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.