Home विदर्भ बुलडाण्यात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; LCB ची

बुलडाण्यात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; LCB ची

186

राजेंद्र पाटील राऊत

बुलडाण्यात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; LCB ची

बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) बुलडाणा शहरातील भीमनगरात स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा मारून देशी- विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. दोघांना ताब्‍यात घेतले असून, त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करत असताना जयस्तंभ चौकात त्‍यांना गोपनीय माहिती मिळाली, की भीमनगर येथील रहिवासी विजय हरी जाधव व आकाश लक्ष्मण जाधव हे दोघे अवैधरित्या घरात देशी-विदेशी दारूचा साठा बाळगून आहेत. पोलिसांनी तातडीने दोघांच्या घरी छापा मारला. त्‍यांच्या घरात देशी-विदेशी दारूचा ४२ हजार ४२० रुपयांचा साठा मिळून आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, पोहेकाँ दीपक लेकुरवाळे, पोहेकाँ रामविजय राजपूत, पो.ना. राहुल बटुकर, दिनेश बकाले, गणेश पाटील, मनोज खरडे, सतीश जाधव, मपोकाँ सरिता वाकाेडे यांनी पार पाडली.

Previous article2 लाख 30 हजारांचा मोहसडवा व दारु नष्ट।
Next articleनगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारी मध्ये भाजपाच्या चारही महीला नगरसेविका शर्यतीत।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.