Home विदर्भ विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर शासनाने दुर्लक्ष करू नये.

विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर शासनाने दुर्लक्ष करू नये.

178

राजेंद्र पाटील राऊत

विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर शासनाने दुर्लक्ष करू नये.

जळगाव जामोद(सतिश पाटील तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क). :- विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ राहावे याकरता शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील योजनेस पात्र शाळांपैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मार्फत तांदूळ, हरभरा ,दाळ ,मुंगटी ,बाजरी आदी काही पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत होता.

परंतु गेली ३ महिन्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये केवळ बिस्कीटच्या पुड्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आहार देण्यात येत नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा शालेय पोषण आहार मिळावा व हे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहू नये याकरता आज दिनांक १७ जानेवारीला काही विद्यार्थी पालकांसमवेत गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांच्या दालना मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी अक्षय पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अश्पाक भाई, विनोद पाटील उपस्थित होते.

Previous articleचंदनपुरीचा यात्रोत्सव;शासकीय आदेश किती खरा किती खोटा…! कोरोनाची ऐसी की तैसी…!!
Next articleमुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी काँग्रेस अध्यक्षांचे उपोषण.शेगाव तहसील समोर आमरण उपोषणास सुरु…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.