Home कोकण राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे रत्नागिरीमध्ये उत्साही वातावरणात प्रकाशन..

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे रत्नागिरीमध्ये उत्साही वातावरणात प्रकाशन..

377

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे रत्नागिरीमध्ये उत्साही वातावरणात प्रकाशन..
रत्नागिरी – सुनिल अनंत धावडे – ब्युरो चीफ रत्नागिरी युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल अँन्ड पेपर
जिल्हा परिषद रत्नागिरी उपाध्यक्ष दालन येथे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल अँन्ड पेपरचे ब्युरो चीफ रत्नागिरी सुनिल अनंत धावडे व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३.०१.२०२२ सोमवार रोजी, राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा माननीय श्री. उदयजी बने ( उपाध्यक्ष – जिल्हा परिषद, सभापती – बांधकाम समिती, आरोग्य समिती) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी श्री उदयजी बने हे बोलताना म्हणाले कि युवा मराठा महासंघाचे कार्य हे अनमोल आहे तसेच युवा मराठा पत्रकार संघातील पत्रकार हे कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील न राहता त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणताही भेदभाव न करता प्रयत्नशील रहावे तसेच पत्रकारांनी जाहिरातींची अपेक्षा न ठेवता सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी व जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणी हे कार्य सुनिल धावडे नक्की करतील अशी मी अपेक्षा व्यक्त केली. असे बोलून त्यांनी युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. सुजित झिमण ( माजी सभापती), श्री. दत्ता कदम ( माजी सभापती), श्री. विवेकराव सावंत( अध्यक्ष – माचाळ पर्यटन संस्था), श्री. महेश देसाई ( उपसरपंच – ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये / नारशिंगे), श्री. राहुल सोनकांबळे ( ग्रामसेवक), श्री. समिर गोताड ( मुख्य सचिव – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी), श्री. संतोष आग्रे ( कार्याध्यक्ष – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी) इ.उपस्थित मान्यवर होते.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने हसन सय्यद यांचा गौरव
Next articleसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.