Home कोकण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास 🛑

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास 🛑

187

राजेंद्र पाटील राऊत

🛑 गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास 🛑
राजापूर : ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

राजापूर :⭕ कोकणात शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन शेतकरी जादा उत्पन्न मिळवत आहे. काही महिन्यांपूर्वी ओणी येथील डॉ. शैलेश शिंदे-देसाई यांनी शंभर फूट संरळ उंच वाढणार्‍या टुल्डा, बाल्कोवा, लेटीफ, भिमा या बांबूच्या प्रजातींची यशस्वी लागवड केली आहे. या निमित्ताने पूर्व भारतातील राज्यांमध्ये लागवड होणार्‍या बांबूच्या प्रजातींची कोकणच्या लाल मातीमध्ये रूजवात झाली आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पीएचडी पूर्ण केल्यानंतर डॉ. शिंदेदेसाई यांनी अर्थाजनासाठी नोकरी स्वीकारली. मात्र, शेतीक्षेत्राला व्यवसायिकरूप देण्याकडे कल असल्याने त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती क्षेत्राची कास धरली. त्यांनी गेल्या काही वर्षात ओणी येथे शेतीचे नवनवीन प्रयोग केले आहेत. शेततळे, रोपवाटीका, मत्स्यपालन, ग्रामीण पर्यटन, काजू प्रक्रिया उद्योग, गोपालन, आंबा-काजू लागवड आदी विविध व्यवसायातून अर्थाजर्नाचा पर्याय निर्माण करत यशस्वी शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होईल, अशा बांबू लागवडीलाही त्यांनी नुकतीच चालना दिली आहे.

बांबूची तोड झाली असून उत्पन्न सुरू बांबूला मोठ्याप्रमाणात मागणी असून कमी खर्चात जादा उत्पन्न असे हे पीक आहे. त्यांनी ओणी येथे एक हजार बांबूंच्या रोपांची लागवड केली आहे. त्यात पारंपरिक माणगा, चिवा या बांबूंसह आसाम, मिझोराम, अरूणाचल, मणिपूर आदी राज्यांमध्ये लागवड केला जाणार्‍या प्रजातींचा समावेश आहे. बांबूची काही बेटं मोठी वाढली आहेत. नुकतीच बांबूची तोड झाली असून उत्पन्न सुरू झाले आहे. बांबूच्या शेतीमध्ये वडील सुभाषचंद्र शिंदेदेसाई, आई विजयादेवी शिंदेदेसाई यांच्यासह पत्नी शुभांगी आणि मित्रपरिवाराने मोलाची साथ दिल्याचेही डॉ. शिंदे देसाई यांनी सांगितले.

“चांगले उत्पन्न मिळवून देणार्‍या बांबूला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. हे ओळखून बांबूच्या एक हजार रोपांची लागवड केली.
कोकणातील वातावरण या प्रजातींच्या लागवडीला पोषक असल्यामुळे चांगली वाढ होवून उत्पन्नही अधिक मिळेल.”- डॉ. शैलेश शिंदे-देसाई, शेतकरी ⭕

Previous articleभारत-पाक सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ‘स्टार’ने कंपन्यांकडून घेतलेली रक्कम पाहून व्हाल थक्क 🛑
Next articleकोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.