Home पुणे भारत-पाक सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ‘स्टार’ने कंपन्यांकडून घेतलेली रक्कम पाहून व्हाल थक्क...

भारत-पाक सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ‘स्टार’ने कंपन्यांकडून घेतलेली रक्कम पाहून व्हाल थक्क 🛑

286

राजेंद्र पाटील राऊत

🛑 भारत-पाक सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ‘स्टार’ने कंपन्यांकडून घेतलेली रक्कम पाहून व्हाल थक्क 🛑
पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

क्रीडा :⭕भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. त्यातही तो सामना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील असेल तर उत्साहाबद्दल विचारायलाच नको.

चाहत्यांच्या उत्साहाबरोबरच या सामन्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट शिगेला पोहचलीय आणि ती गोष्ट आहे सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर. एक्सचेंज फॉर मीडिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार भारत पाक सामन्यादरम्यानच्या १० सेकंदांच्या जाहिरातीच्या स्लॉटसाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपये आकारले जाणार आहेत. “या सामन्यादरम्यानच्या जाहिरातींचे स्लॉट विकून झाले आहेत. १० सेकंदांच्या स्लॉटसाठी प्रायोजक कंपन्यांकडून १७ ते १८ लाख रुपये घेण्यात आले आहेत. शेवटच्या क्षणला जाहिराती घेताना हा दर १० सेकंदांसाठी २५ ते ३० लाख इतका होता,” असं या क्षेत्राशी संबंधित एका मीडिया प्लॅनरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

या मालिकेसाठी १४ जाहिरातदार कंपन्या आहेत. यात ड्रीम ११, बायजूज, फोनपे, थम्ब्स, विमल, हेवल्स, जीओमार्ट, नेटमेड्स डॉट कॉम हे को प्रेझेन्टींग स्पॉनसर्स आहेत. तर आकाश, स्कोडा, व्हाइटहॅट जेआर, ग्रेट लर्निंग, कॉइन डीसीएक्स आणि ट्रेण्ड्स हे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. यापैकी को स्पॉन्सर्सला ६० ते ७० कोटी मोजावे लागले आहेत तर को स्पॉन्सर्सला ३० ते ४० कोटी मोजावे लागलेत.

२४ तारखेपासून भारत या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २९ दिवस चालणार असून एकूण ४५ सामने या स्पर्धेत होणार आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे.⭕

Previous articleया वर्षीचा “दक्षता जनजागृती सप्ताह” आजपासून 26 ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणार       
Next articleगलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.