Home माझं गाव माझं गा-हाणं या वर्षीचा “दक्षता जनजागृती सप्ताह” आजपासून 26 ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणार ...

या वर्षीचा “दक्षता जनजागृती सप्ताह” आजपासून 26 ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणार       

118
0

राजेंद्र पाटील राऊत

या वर्षीचा “दक्षता जनजागृती सप्ताह” आजपासून 26 ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणार                                        पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

राज्यात दर वर्षी “दक्षता जनजागृती सप्ताह” चे आयोजन करण्यात येते. 26 ऑक्टोबर 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत “दक्षता जनजागृती सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने पालघर अँटी करप्शन ब्युरो,पालघर कार्यालय मार्फत “दक्षता जनजागृती सप्ताह” निमित्त पालघर जिल्ह्यामध्ये 26 ऑक्टोबर2021 ते दिनांक 1 नोव्हेंबर2021 या कालावधीत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यात येणार आहे.
ऑगस्ट 2014 पासून पालघर जिल्हाकरिता स्वतंत्र असे अँटी करप्शन ब्युरो, हे कार्यालय पालघर येथे केदार बिल्डिंग, कोर्टाच्या समोर,सूर्य कॉलेनी पालघर (पश्चिम) येथे कार्यरत असून आज पर्यंत अँटी करप्शन ब्युरो,पालघर कार्यालया कडून लाचखोरविरुद्ध
एकूण ८७ यशस्वी सापळा कारवाई करण्यात येऊन त्यामध्ये १२३ लाचखोर शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच सन २०२१ मधे एकूण १२ सापळा कारवाई करण्यात आल्या असून त्यामध्ये एकूण २० लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे.
अँटी करप्शन ब्युरो,पालघर कार्यालयाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने जे शासकीय नोकर,निमशासकीय नोकर शासकीय फी व्यतिरिक्त पैशाची अथवा वस्तूची
मागणी करतात अशा शासकीय नोकराविरुद्ध तक्रार देण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने पुढे येऊन अँटी करप्शन ब्युरो,पालघर कार्यालयाशी
पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे

हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1064
अँटी करप्शन ब्युरो,पालघर 02525-297297 ई-मेल आय डी-

dyspacbpalghar@gmail.com

वेबसाईड – WWW.acbmaharashtra.gov.in

फेसबुक पेज –
WWW.facebook.com-maharashtraACB

श्री नवनाथ जगताप,
पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो पालघर,
9923346810/9850158810

श्री स्वपन बिस्वास,
पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,पालघर
9405722011

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here