Home मुंबई सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही – संजय राऊत

सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही – संजय राऊत

222

राजेंद्र पाटील राऊत

सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही – संजय राऊत
मुंबई – (अंकुश पवार, प्रतिनिधी, युवा मराठा न्यज नेटवर्क)
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी कारवाईसंबंधी चर्चा केली होती. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली
तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे
महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न
नाट्याला एक परंपरा, पावित्र्य असून त्यात एक सत्यता असते. मराठी नाटकाला प्रतिष्ठा आहे असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका केली आहे.किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, “कोणता रंग आमचा आहे तो त्यांना लवकरच कळेल.

Previous articleमोदी सरकारची नवी वेतन संहिता : आठवड्यात ४ दिवस काम,वेतन घटणार?
Next articleसटाणा नगरपालिकेचा अनोखा गणपती मुर्ती विसर्जन कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.