सटाणा — शशिकांत पवार नवे निरपुर येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने ग्रामपंचायत व आमदार दिलीप बोरसे मित्र मंडळ च्या वतीने हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत मालकीचे गावठाण यासाठी उपलब्ध करून देण्यात आले .नवे निरपुर हे गाव आदर्श ग्राम, निर्मल ग्राम अशा अनेक पुरस्कारांनी प्राप्त असून आतादेखील सुंदर ग्राम योजनेत या गावाने जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे या गावाने आपले पडलेले गावठाण वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामस्थांचे व गावाचे कौतुक होत आहे याप्रसंगी सरपंच मुन्ना दादा सूर्यवंशी ,माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी उपसरपंच अरुण सूर्यवंशी, सदस्य सचिन सूर्यवंशी ग्रामसेवक वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Home Breaking News नवे निरपुर येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने ग्रामपंचायत व आमदार दिलीप बोरसे...




