Home नांदेड कलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या आनंदात अनावरण….

कलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या आनंदात अनावरण….

325

राजेंद्र पाटील राऊत

कलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या आनंदात अनावरण….

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दि.३० मे रोजी सकाळी १० वाजता मौ.कलंबर येथे मोठ्या आनंदात अनावरण संपन्न झाले.या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प.स.सदस्य पंढरी कांबळे,प्रमुख पाहुणे डॉ.शिवाजीराव वासरे,प्रमुख वक्ते विद्यासागर डोरनाळीकर,उत्तमकुमार इंगोले सर व गावचे सरपंच विठाबाई यादवराव बापुणे हे उपस्थित होते.
गावामध्ये हा डॉ.बाबासाहेबांचा भव्य-दिव्य पुतळा उभा राहण्यामध्ये,गावातील शिक्षित तरुणांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा आहे.गावामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले.आता बाबासाहेबांचे विचार गावामध्ये रुजवण्याचे कार्य हीच तरुण पिढी पूर्ण करेल,असे मनोगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी व्यक्त केले.
गावामध्ये हा पुतळा उभा करण्यासाठी व या कार्यक्रमासाठी अनिल लष्करे,विठ्ठल कांबळे,धम्मानंद लष्करे,हर्षवर्धन धनवे,वैभव कलंबरकर,राजेंद्र वानकर,कृष्णा वानकर,नारायण कलंबरकर, पोलिस पाटील शिवाजीराव धनवे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमराठा क्रांती मोर्चा वतीने चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहनाचा प्रयत्न
Next articleइंदिरा गांधी सामान्य रुग्णालया त अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस                   
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.