Home उतर महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा वतीने चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहनाचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चा वतीने चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहनाचा प्रयत्न

148
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा क्रांती मोर्चा वतीने चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहनाचा प्रयत्न

धुळे  ( युवा मराठा न्युज नेटवर्क) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होत की, चोखलेला आंबा कापता कसा येईल ? आणि छत्रपती संभाजी राजे यांना भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.
ह्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शहरातील संभाजी पुतळ्याच्या समोर चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला आहे तसेच मराठा क्रांती मोर्चा कडून चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेसमोर मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आपला आक्रोश व्यक्त केला असून पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा वआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Previous articleनायगाव येथे बच्चेवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरा
Next articleकलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या आनंदात अनावरण….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here