Home पश्चिम महाराष्ट्र इंदिरा गांधी सामान्य रुग्णालया त अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार...

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालया त अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस                   

107
0

राजेंद्र पाटील राऊत

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालया त अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस                                                                                                      युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

इचलकरंजी नागरिक मंचच्या पदाधिकार्‍यांनसमवेत अचानकपणे भेट दिली असता त्याठिकाणी अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे व्हेंटीलेटर जर वापरात असते तर बहुतांशी जणांचे प्राण वाचविता आले असते. पण रुग्णालय प्रशासनाकडून उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नादुरुस्त व्हेंटीलेटर दुरुस्तीसाठीचा सर्व खर्च कल्लाप्पाण्णा आवाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

चार दिवसांपूर्वी आयजीएम रुग्णालयात उपलब्ध 20 व्हेंटीलेटरपैकी केवळ 3 मशिन सुरु असून उर्वरीत 17 व्हेंटीलेटर बंद असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र त्या संदर्भात प्रशासन अथवा रुग्णालयाकडून काहीच हालचाली अथवा त्या संदर्भात वाच्यता करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णालयास अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी अनेक व्हेंटीलेटर आणल्यापासून तसेच विनावापर पडून असल्याचे निदर्शनास आले. जबाबदार अधिकारीही कोणी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शहरवासियांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी तक्रार करतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नसते. पण मी चांगल्या कामासाठी तक्रार केली तरी ती बाब चेष्टेवर नेली जाते. आरोग्य सुविधांबाबत हेळसांड होत असल्याने ‘आण्णा को गुस्सा आता है‘ याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.

त्याचबरोबर सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने अतिदक्षता विभागासाठी स्वतंत्र जंबो सिलेंडर वापरुन आणि स्वतंत्र पाइपलाईन जोडून घेऊन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असून ती यंत्रणाही लवकरच कार्यान्वित केली जाईल. येत्या आठवडाभरात 23 व्हेंटीलेटर कार्यान्वित करण्यासह जवाहर साखर कारखान्याकडून 25 एनआयव्ही मशिन देण्यात येतील. त्याचबरोबर 10 लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन देण्यात येणार असून ते एनआयव्ही ला जोडून त्याद्वारे विनापाईप रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.

Previous articleकलंबर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या आनंदात अनावरण….
Next articleनदीकाठच्या भागात बोटी ठेवा : आ. देशमुख             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here