Home गडचिरोली रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा

रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा

268

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0068.jpg

रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा

अन्यथा आंदोलन करू; मुलचेरा तालुका काँग्रेसचा इशारा

मुलचेरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. आष्टी अल्लापल्ली सीरोंचा महामार्ग पूर्णतः नेस्तनाभूत झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरजागड लोखनीज वाहतुकीचा मुख्य मार्ग अल्लापल्ली – आस्ठी आहे. मात्र हे महामार्ग खराब झाल्याने त्या रस्त्यावर चालणारी सुरजागड लोह खनिजाची वाहतूक अल्लापल्ली- मुलचेरा मार्गे आष्टी कडे होते. सदर भागातील रस्ते हे अरुंद व चिरिव असल्याने याही भागात अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्यामुळे आष्टी आलापल्ली महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरजागड लोहखानीची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावे, अन्यथा मूलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुलचेरा तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे.
यासंदर्भात तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, उपाध्यक्ष अनुप नांदी, काँग्रेस कार्यकर्ते खुशाल येलमुले, किसन कोत्तावा, र सुशांत हलदर, जितेंद्र तनमलवार, आनंदराव यांनी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणयात आले आहे.

Previous articleसर्वसाधारण नागरिकांना सहाशे रुपयांत मिळणार वाळू. जनतेचे स्वप्न होणार साकार
Next articleमराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे प्रस्ताव सादर 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.