राजेंद्र पाटील राऊत
🛑 छत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕मी बहुजन समाजाचं नेत्रृत्व करतो
70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या
जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू
मुख्यमंत्र्यांनी तातडीने पत्र लिहून सर्व आमदार, खासदारांना चर्चेसाठी बोलवावं, मी सुद्धा येईल
मी सगळ्यांना अंगावर घेतलंय, ज्यामुळं माझं सामाजिक आणि राजकीय नुकसान होणार आहे. पण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीसाठी मी समोर आलोय – छत्रपती संभाजीराजेंची प्रथमच कबुली
आरक्षणासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, संभाजी राजेंची मागणी
दिल्लीत गोलमेज परिषद घेणार
8 ऑगस्टला सर्वांना आमंत्रित करणार
आरक्षणासाठी दिल्लीत खासदारांची परिषद घेणार
सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, सारथीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी
ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावं
तिसरा पर्याय 342 ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपल प्रपोजल राज्यपालांसमोर मांडावे केंद्रा पुढे मांडा गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा
दुसरा पर्याय आहे क्युरेटिव्ह पीटिशन
पहिला पर्याय राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी, केवळ लोकांना दाखवण्यासाठी नको तर फूल प्रुफ असावं
मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, आम्हाला बाकी देणंघेणं नाही – संभाजीराजे यांचा सत्ताधारी आणि विरोधकांना निर्वाणीचा इशारा
वेळ पडली तर कायदा सुद्धा हातात घेतील, आज माझ्यामुळे ते शांत आहेत
मराठा समाज व्यथित झाला आहे
मराठा समाजातील नागरिक अस्वस्थ आहेत, दु:खी आहेत
मराठा समाजाला वेठीस धरू नका
मला साथ देणाऱ्या मराठा समाजाचे आभार मानतो
कोरोनामुळे मवाळ भूमिका घेतली
कोर्टाच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालो
50 लाख लोक आझाद मैदानात आले होते
आपल्या सर्वोच्च न्यायलयाने फॉरवर्ड क्लास असे म्हटल आहे
न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल अवैध ठरवण्यात आला
मराठा समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आमचा लढा
कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाहीये
कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आमची लढाई नाहीये
2007 पासून महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे
मराठा समाजाला न्याय मिळावा ही एक सरळ मागणी आमची आहे
मी सकल मराठा समाजाच्या वतीने बोलतोय. ⭕