राजेंद्र पाटील राऊत
🛑 साहित्यीक क्षेत्रातील युवक व टायगर ग्रुपच्या वतीने कोरणा पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना उद्यापासून मोफत चहा नाष्टाची सोय 🛑
✍️ सांगोला 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
धायटी-सांगोला:-⭕सध्या चालू असलेली कोरोणाची दुसरी लाट यामध्ये वारंवार कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही कुटुंबामध्ये सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याने रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होत आहे हे निदर्शनास येताच सांगोला तालुक्यातील सन्मान साहित्याचा समुह महाराष्ट्र राज्य या समूहातील युवक पत्रकार कवी खंडू भोसले, यूवा कवी तुषार गुळीग, यूवा कवी अनिल केंगार, यूवा कवी मोहिद्दिन अली,युवा कवी गौसपाक मुलाणी, सुधीर कोले व टायगर ग्रुप राणीताई चव्हाण,शिवाजी मोकाशी यांच्यावतीने हा उपक्रम आज पासून राबवण्यात आला.
या समूहातील सर्व नेतृत्वांनी एक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून युवा पिढी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.यामध्ये चहा, पोहे,अंडी , केळी,दूध,इटली, डाळ राईस इत्यादि वेगवेगळ्या पदार्थांचा नाष्टा देण्यात आला.
कोरोना सारखे संकट अनेक कुटुंबाला घातक ठरत आहे. संपर्कातुन होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रसाशन प्रयत्नशील आहेच.परंतू कुटुंबात आलेला पोस्टिव्हव व्यक्तीना सकाळी चहा आणि नाष्टाची पाण्याची सोय करणे अडचण होत असते.
ग्रामीण भागातील रुग्ण शहरात दाखल झाल्यानंतर गावातून भोजनाची व्यवस्था करण्यामध्ये उशीर होत असताना ,सदर उपक्रमातून या रुग्णांना एक आधार मिळेल.या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.⭕