Home नांदेड तथागत बुद्धांचे विज्ञानवादी विचारच मानवाच जीवन अविरतपणे प्रकाशमय करतील – भारत सोनकांबळे

तथागत बुद्धांचे विज्ञानवादी विचारच मानवाच जीवन अविरतपणे प्रकाशमय करतील – भारत सोनकांबळे

284
0

राजेंद्र पाटील राऊत

तथागत बुद्धांचे विज्ञानवादी विचारच मानवाच जीवन अविरतपणे प्रकाशमय करतील – भारत सोनकांबळे

बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार मध्ये
बुद्ध पौर्णिमेनिमीत्त खीरदान करुन बुद्ध जयंती साजरी
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
▪️आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना संपुर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी प्रज्ञा,शील,करुणा,यांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद विश्वाला शांतीचा संदेश देणारे, विश्वशांतीचे उद्गाते आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपुर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसावादी, समतावादी,विज्ञानवादी विचारांमध्ये आहे.
तथागत गौतम बुद्धांच्या अहिंसावादी व विज्ञानवादी विचारांद्वारेचं मानवजातीचं कल्याण शक्य असून
आता जगला युद्धाची नाही तर बुद्ध विचारांची गरज आहे.

पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर
तालुकाध्यक्ष – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,मुखेड

गेल्या वर्षभरापासून देशातच नव्हे तर संपूर्ण जगा मध्ये कोरोना (कोविड-१९) या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. देशातील सद्यस्थिती ची जाणीव ठेवत संचार बंदी कायद्याचे काटेकोरपणे पालन करीत मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार येथे दि. २६ मे २०२१ रोजी सकाळी ९: ३५ वाजता येथील धम्मशील बुध्द विहारात फिजीकल डीस्टन्स चे पालन करून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रमाई फाऊंडेशन बेटमोगरा चे सचिव तथा निर्भिड पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून हा खीरदान व बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात जगाला शांतीचा संदेश देणारे, दुःख मुक्तीचे मार्गदाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमांना बेटमोगरा ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच नयुम मुसा दफेदार व ग्रा.पं सदस्य धनराज पाटील, माजी ग्रा.पं.सदस्या लालिताबई सोनकांबळे,दिपक सोनकांबळे, रामजी सोनकांबळे ( शिक्षक), पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली.”या कार्यक्रमा चे अध्यक्ष नयुम दफेदार (सरपंच) तर प्रमुख पाहुणे धनराज शिवराज पाटील हे होते.
या प्रसंगी बोलताना रमाई फाउंडेशन चे सचिव पत्रकार भारत सोनकांबळे म्हणाले की,भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे तथागत बुद्धांचे अहिंसावादी व विज्ञानवादी विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील,तसेच विश्वशांतीचे उद्गाते, आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच् आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे,
विश्ववंदनीय बोधिसत्व सम्यक संबुद्ध यांच्या जीवनकार्याला उजाळा देत बुद्ध पौर्णिमेनिमित
त्यांच्या विज्ञानवादी व अहिंसेचा,दयेचा,करुणेचा, तसेच अत, दीप,भव, स्वयं दीप हो, हा जो संपूर्ण मानवजातीला संदेश दिला. आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील,असा विश्वासही यावेळी पत्रकार भारत सोनकांबळे यांनी व्यक्त केला.
यावेळी बेटमोगरा नगरीचे सरपंच नयुम मुसा दफेदार,धनराज पाटील(ग्रा.पं.सदस्य)माजी ग्रा.पं.सदस्या लालिताबई मालू सोनकांबळे, प्रल्हाद सोनकांबळे,रामजी सोनकांबळे(शिक्षक), निवृत्ती पोटफोडे,दीपक सोनकांबळे,दिलीप सोनकांबळे, अशोक पोटफोडे, राहुल सोनकांबळे, सुनील सोनकांबळे,दत्ता सोनकांबळे, संदेश सोनकांबळे,मेजर सोनकांबळे,विकास सोनकांबळे, आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन पत्रकार भारत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामजी सोनकांबळे (शिक्षक) यांनी केले.

Previous articleसाहित्यीक क्षेत्रातील युवक व टायगर ग्रुपच्या वतीने कोरणा पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना उद्यापासून मोफत चहा नाष्टाची सोय 🛑
Next articleवडगांवात दहा मावळ्यांनी सुरू केले मोफत कोविड केअर सेंटर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here