Home मुंबई चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 🛑

चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 🛑

261

राजेंद्र पाटील राऊत

🛑 चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

बोरीवली :-⭕ चिकूवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

उत्तर मुंबई चे खासदार श्री.गोपाळ शेट्टी यांनी जिल्ह्यात 500 रक्त पिशव्या संकलनाचा निर्धार आणि संकल्प केला असून त्यांनी हे काम फक्त राजकीय पक्षांनाच नाही तर सर्व सामाजिक संस्था यांनाही आवाहन केले आहे.

त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन बोरिवली स्थित चिकूवाडी रेसीडंट वेल्फेअर असोसिएशन संस्थेने त्वरित आज दिनांक 4.4.2021 रोजी संस्थेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.स्थानिक नागरिकांनी भरघोस पाठिंबा देत 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांनी दाखविलेल्या विश्वासा बद्दल खासदार श्री. गोपाळ शेट्टी,आमदार श्री.सुनील राणे, जिल्हाध्यक्ष श्री.गणेश खणकर यांनी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

तसेच उत्कृष्ट आयोजनासाठी श्री.बापू गायकवाड, किरण मोटाणी आणि संयोजक महेश राऊत यांना सन्मानित करण्यात आले.⭕

Previous articleझेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड कचरावेचक महिलांना सँनिटाय पँड चे वाटप करण्यात आले 🛑
Next articleश्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम…! 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.