Home Breaking News नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

220

नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोवीड-१९ रूग्णांची संख्या वाढत आहे. याचवेळी नांदेडमध्ये शासकीय कोवीड उपचार रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत अशा अफवा पसरल्या आहेत.
त्यामुळे मी आज स्वत: या रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रूग्णालयात पुरेसे बेड आवश्यक औषधे उपलब्ध असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही.
विशेष म्हणजे नांदेड – वाघाळा मनपाचे आयुक्त श्री. सुनील लहाने हेही येथेच उपचार घेत आहेत.
परंतू आजच्या पाहणीत एक बाब माझ्या निदर्शनास अशी आली की काही लोक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आवश्यकता नसतानाही या रूग्णालयात एडमिट होत आहेत. अशांनी बेड अडवून ठेवल्यास ज्यांना आवश्यकता आहे त्यांना बेड उपलब्ध होणार नाहीत.

आज मी प्रत्यक्ष पाहणी करून बेड अडवून ठेवलेल्या १० ते १२ जणांना रूग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवले आहे त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार केले जाऊ शकणार आहेत.

पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करतो की आजार लपवू नका सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्या.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या.
आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील अनावश्यक काळजी करू नका.

माञ कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करावे असेही डॉ. विपीन इटणकर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे शॉर्टसर्किटमुळे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..
Next articleदेगलूर येथे प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रमाने महापुरुषाची जयंती साजरी करणार – अशोक कांबळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.