Home Breaking News घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ

216

राजेंद्र पाटील राऊत

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ

दिल्ली : देशात सर्वत्र सर्वसामान्य जनता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका देशातील नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना १४ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहे.
आज दुपारी १२ पासून हे दर लागू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत ६९४ रूपयांवरून ७१९ रुपये करण्यात आली होती.
तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. . पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३४ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर ९५.१९ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ८६.०२ रुपयांवर पोहेचले आहेत.

युवा मराठा न्युज नेटवर्क .