Home मुंबई आमच्या पुजाचे संजय राठोड सोबत संबध नव्हते, लहु चव्हाण यांचे भाष्य

आमच्या पुजाचे संजय राठोड सोबत संबध नव्हते, लहु चव्हाण यांचे भाष्य

87
0

राजेंद्र पाटील राऊत

आमच्या पुजाचे संजय राठोड सोबत संबध नव्हते,
लहु चव्हाण यांचे भाष्य

मुंबई : राज्यात सर्वत्र चर्चेत असणारी पूजा चव्हाणचे आत्महत्या प्रकरण.
पूजा चव्हाण हिचे मंत्रिमंडळातील एका मंत्र्यासोबत संबंध होते अशा उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. पूजाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत संभ्रम आहे. अशातच पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
पूजाने २५ ते ३० लाखांचं कर्ज काढलं होतं. तिने पोल्ट्री व्यवसायासाठी हे कर्ज काढलं होतं. बांधकाम झालं आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू होताच कोरोना आला. त्यामुळे आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या होत्या तेव्हा आमचं १ रूपयाही न मिळता २५ लाखांचं नुकसान झालं होतं. या नुकसानीमुळं पूजा काहीशी ताणात होती आणि तिच्यावर मानसिक उपचारही सुरू होते, असं लहू चव्हाण यांनी सांगितलं.
आमचा कोणावरही संशय नाही. संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका. पूजाचे कोणासोबतही संबंध नाही. कुटुंबावर कोणाचाही दबाव नसल्याचंही लहू चव्हाण म्हणाले. मात्र सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी टीका केली. पूजाच्या आत्महत्येला राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांमागे पूजाची बहिण दिया चव्हाणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, असं दिया चव्हाणने म्हटलं होतं.युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleघरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ
Next articleशिवशंभो कबड्डी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here