Home माझं गाव माझं गा-हाणं बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर मध्यरात्री हल्ला प्रसंगावधाने मेंढपाळाचे प्राण वाचले पण बोकड ठार...

बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर मध्यरात्री हल्ला प्रसंगावधाने मेंढपाळाचे प्राण वाचले पण बोकड ठार मेंढपाळ जखमी,वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या मुक्या प्राण्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात

98
0

राजेंद्र पाटील राऊत

बिबट्याचा मेंढपाळ तरुणावर मध्यरात्री हल्ला प्रसंगावधाने मेंढपाळाचे प्राण वाचले पण बोकड ठार मेंढपाळ जखमी,वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या मुक्या प्राण्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात
सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
वटार येथिल सावतावाडी वस्तित बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे आज मध्य रात्री वटार शिवारातील गट नंबर 23/1 मधील दशरथ येसा महारणर यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत काळू दशरथ महारनार ह्याच्यावर्ती झोपेत असतांना हल्ला चढवला असतां डोक्याला व तोंडाला जखम झाली असता तात्काळ त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  तरीपण बिबट्या तिथेच ना थांबता पुन्हा दुसरा हल्ला बापू गोविंद खैरनार यांच्या राहत्या घराजवळील शेडमधील बोकड उचलून नेतं भक्ष्य केलं. एकाच रात्री दोन हल्ले करत बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्याच वाड्यावर हल्ला झाला होता त्यांतच रात्री पुन्हा बिबट्याने उच्छाद मांडला असून आरडा ओरड केल्याने बिबटया सोडून पळून गेला थोड्यावरून मेंढपाळाचे प्राण वाचले व ह्या गरीब मेंढपाळ कुटुंबाने नि सुटकेचा श्वास घेतला. दररोजच् सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे हि मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व मेंढपाळ धास्तावला आहे.
” गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २०ते २५ निष्पपाप मुक्या प्राण्यांचा जीव गेला आहे, अनेक दिवसापूर्वी सावतावाडी शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, सावतावाडी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन  तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरवर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपण्यासाठी मोठी काटेरी झुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फते करुण घेतो”.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी १०ते १२ मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुन काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात 25  पाळीव प्राण्याना आपला जीव गमवावा लागला असून,  भक्ष्याच्या शोधत बिबटया एका वृद्ध महिलेवरती हल्ला केला होता प्रसंगावधाने महिलेचे प्राण वाचले, वस्तीवर मुक्त दर्शन देतो तरी पण प्रशासन काय करत आहे?. असच चालत राहील तर बिबट्या लवकरच मानवी हानी होऊ शकते अस परिसरातील नागरिकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here