राजेंद्र पाटील राऊत
31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड आज दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णयान्वये 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत सायंकाळी अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.त्या दृष्टीने संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2020 या नूतन वर्षाच्या स्वागत करावयाच्या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना च्या अनुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचार बंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देण्यासाठी 1 जानेवारी 2021रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.