Home कोकण छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोज

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोज

291

राजेंद्र पाटील राऊत

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोज
रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी-मित्रांनो आपल्या राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतं आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरेसाहेब आणि आरोग्यमंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपेसाहेब यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.

छावा प्रतिष्ठान रत्नागिचे अध्यक्ष श्री.सुनिल धावडेसाहेब आणि उपाध्यक्ष श्री.सुनिल आग्रेसाहेब यांच्या संकल्पनेतून छावा प्रतिष्ठान स्थापन झाले असून समाजातील गरजूं लोकांना मदत करण्याचे काम प्रतिष्ठान करते.याच भावनेतून गोळप (नवेदरवाडी) येथील दत्तमंदिरात दत्त जयंतीचे औचित्य साधून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन छावा प्रतिष्ठान ने या “रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन केले जाणार आहे.

२९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते ०१ या वेळेत श्री.दत्त मंदिर गोळप (नवेदरवाडी) येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी आपली नावे ८८०६०३०४२०,९६२३९३८१९४,९१५८५४७७७८ या नंबर वर कळवावी असे आवाहन छावा प्रतिष्ठान रत्नागिरीकडून करण्यात येत आहे.

श्री.नितीन सूर्यकांत रोडे
(मीडिया प्रमुख – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी)..⭕

Previous articleमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा..! मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तलाठी भरती प्रकरणात मोठा दिलासा 
Next articleमनसे कामगार सेनेच्या राज्य सहचिटणीस पदी संदिप फडकले यांची निवड 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.