राजेंद्र पाटील राऊत
पुणे येथील चोरीच्या मोटारसायकलींची बाराहळी परिसरात विक्री .पुणे पोलीसांची कारवाई आठ दुचाकीसह तिघे जण पोलिसांच्याताब्यात.
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
बाराहाळी. गेल्या वर्षभरापासून पुण्याहून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकलच्या चोऱ्या कडून सदरील चोरीच्या गाड्या बाराहाळी परिसरात विक्री करणाऱ्या तिघा आरोपी सह आठ मोटारसायकली ताब्यात घेण्यात पुणे पोलीस पथकाला यश आले आहे . अजूनही अनेक मोटरसायकली या परिसरातून हस्तगत करायचे असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आल्यानंतर त्या काळात लोक घरामध्ये स्वतःला कोंडून घेतले होते त्याचाच फायदा घेत पुणे येथील कार्यरत असलेली चोरांची टोळी मोठ्या प्रमाणावर मोटरसायकलची चोरी करून राज्यात अनेक भागांमध्ये ती विक्री केली आहे पुणे पोलिसांच्या तपासामध्ये बाराहाळी येथे जवळपास पंधरा ते वीस मोटरसायकली आणून विकल्याचे निष्पन्न होतच काल थेट पुणे पोलिसांचे पथक बारा हळी येथे दाखल झाले . येथील तीन व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्या कबुलीजबाब वरून मोटरसायकली जप्त केल्या आहेत. सदरील आठ मोटरसायकली व तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन पुणे पोलीस पुण्याकडे रवाना झाले असून अजूनही बाराहाळी परिसरात दहा ते पंधरा मोटरसायकली बिनधास्त विना नंबरच्या फिरत आहेत बारा हलीत कार्यरत असलेल्या सदरील मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीच्या सदस्यांनी कमीत कमी किमतीत मोटरसायकली अनेकांना विकले असल्याचे समजते गाड्या विक्री करत असताना ग्राहकांना विश्वासात घेऊन गाडीची कागदपत्रे आणून दिल्यानंतर बाकीचे पैसे द्या अशी बतावणी करून सुरुवातीचे मिळेल तेवढे पैसे घेतल्याचे अनेकांनी म्हटले आहे.