चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे.
आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत तर डाँ.बाबा आमटे यांची नात होती.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. स्व.डाँ.शितल आमटेना युवा मराठा न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली.
कोल्हापूर( युवा मराठा न्यूज नेटवर्क )




