राजेंद्र पाटील राऊत
ज्यांना बिरसा कळला, त्यांना आदिवासी संस्कृती कळली,,ज्यांना संस्कृती कळली त्यांनी केली प्रकृतीची आळवणी (पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्यूज तालुका प्रतिनिधी सुरगाणा )
नाशिक -येथील आदिवासी संस्कृतीसंवर्धक, रक्षक आप धनंजय भोये प्रा. शिक्षक सराड ता. सुरगाणा यांनी आपल्या नवीन घराची घरभरणी ही प्रस्थापित कर्मकांडांना मूठ माती देत आपल्या आदिवासी रीतीने पार पाडली. आदिवासी संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे परंतु आताच्या धर्म कर्मकांडांमुळे ती लोप पावत चालली असं वाटतंय. म्हणून आप धनंजय भोये सर यांनी आपल्या संस्कृती जतन व्हावी यासाठी त्यांनी आदिवासी रीतीने घरभरणी केल्याने नातेवाईक, मित्रपरिवार, सगेसोयरे आदिवासी बचाव संघटना यांच्याकडून कौतुक केलं जात आहे. या बदलाची सुरवात स्वतःपासून केल्याने नवीन आदिवासी पिढीसाठी एक नवीन आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
घर भरणी साठी आपल्या निसर्ग देवताची मांडणी आतिशय चांगल्या पद्धतीने केली होती. या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठानी भोये दाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले.