मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड औरंगाबाद पदवीधर निवडणूक प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सचिन ढवळे यांची पदवीधर निवडणूक बैठक व सहविचार सभेचे आयोजन मनोहर पाटील मुखेड येथे करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख नामदार बच्चुभाऊ कडू यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्राध्यापक सचिन ढवळे यांचे अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महापोर्टल घोटाळा उघडकीस आणणारे व महापोर्टल बंद व्हावे यासाठी आंदोलन करणारे सामान्य कुटुंबातील प्राध्यापक सचिन ढवळे यांचा मतदारसंघात प्रचार दौरा सुरू असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड शहरातील मनोहर टाकीज येथे सकाळी अकरा वाजता बैठक व सहविचार सभा घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष विठ्ठल राव देशमुख देगलूर तालुका अध्यक्ष कैलास येसगे तालुका अध्यक्ष शंकर भाऊ वडेवार शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड मुखेड तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे यांनी केले आहे. या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते