Home Breaking News मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…

मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…

105
0

मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क. मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आर्य वैश्य मंगल कार्यालय मुखेड येथे दि. 19 11 2020 रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग 59 जागा मिळाल्या असून यामध्ये 30 जागा महिलांना कर 29 जागा पुरुषांना मिळाले आहेत व इतर मागासवर्गीय प्रवर्ग 34 जागा मिळाले असून 17 जागेवर महिला तर 17 जागा पुरुषांना मिळाले आहेत. व तसेच अनुसूचित जाती प्रवर्ग यासाठी 28 जागा मिळाल्या असून 14 जागा महिलांसाठी तर 14 जागा पुरुषासाठी मिळाले आहेत. व तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात 7 जागा मिळाल्या असून यामध्ये 3 जागा महिलांसाठी तर 4 जागेचे आरक्षण पुरुषांना मिळाले आहे. मंगल कार्यालयात सकाळ पासून भरपूर गर्दी होती. एकूण 128 जागांपैकी 64 जागेवर महिलाराज मिळाले आहे या आरक्षणाच्या कामांमध्ये तहसीलदार श्री काशिनाथ पाटील नायब तहसीलदार मामीलवाड साहेब तसेच नायब तहसीलदार श्री महेश हांडे संदीप भुरे प्रशांत लिंबेकर सुनिल कुलकर्णी व निवडणूक विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते..

Previous articleमुखेड औरंगाबाद पदवीधर निवडणूक प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे
Next articleसंभाजी बिग्रेड देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी श्री बालाजी बिरादार येडूरकर यांची निवड..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here