Home Breaking News *सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक

*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक

173

*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक*
सटाणा,( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सटाणा तालुक्यातल्या केरसाणे येथील युवकाला औरंगाबाद येथे सिडको महामंडळाच्या कार्यालयात लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लोहणेर ता.देवळा येथील सोमनाथ पवार याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याने त्यास सटाणा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,सन २००६ साली लोहणेर ता.देवळा येथील सुधाकर पवार या व्यक्तीने केरसाणे ता.सटाणा येथील दिलीप सुकदेव मोरे यांच्या मुलाला औरंगाबादच्या सिडको महामंडळात लिपिक पदावर नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून आठ लाख रुपयांची मागणी केली.पैकी मोरे यांच्याकडून आगाऊ दोन लाख रुपये घेऊनही सुधाकर पवार याने काम केले नाही.व पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.व मोरे यांना बँक आँफ महाराष्ट्रचा धनादेश दिला,मात्र तो धनादेश वटलाच नाही म्हणून दिलीप सुकदेव मोरे यांनी सटाणा तालुका पोलिसात फिर्याद दाखल करताच तपासाची चक्रे गतीने फिरवून सुधाकर पवार यास अटक करण्यात आली आहे,सोमनाथ पवार यास न्यायालयात हजर केले असता त्यास गुरुवार दि. १२ नोव्हेंबर पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Previous article🔴 *ब्रेकींग न्यूज* 🔴 *वडगांव शहरात जबरी चोरी* *१८ तोळे सोने , ५५हजार रोख रक्कम* *घेऊन चोरटे पसार*
Next articleश्री जयभवानी संस्थेची १२५कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.