*रावळगांवी एस.जे.शुगर मिल्सच्या*
*गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ*
रावळगांव,( गोकूळ दळवी प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात एकेकाळी नावलौकिक प्राप्त असलेल्या रावळगांव साखर कारखान्याचा काही कालखंड हा अडचणीत गेलेला असला तरी आता पुन्हा या कारखान्याला गतवैभव प्राप्त होणार असल्याची चिन्हे परत एकदा दिसू लागली आहेत.
आज रावळगांव कार्यस्थळावर एस,जे.शुगर मिल्स अँण्ड डिस्टलरीजचा सन २०२०ते २०२१ या गळीत हंगामाचा मोठ्या शानदार वातावरणात शुभारंभ पार पडला.
एस.जे.शुगर मिल्सचे संचालक सौ.सिमा इघे व इंघे साहेब यांच्या शुभहस्ते या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.