*उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी बेटमोगरेकरांची भेट..*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आज नांदेड येथे उंद्री (प.दे) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी व पाठपुराव्यासाठी *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांची भेट *माधवराव पाटील उंद्रीकर* (माजी चेअरमन ख.वि.संघ मुखेड,शौकत पठाण, सुधाकर गुरूजी गन्लेवार ,शिवाजीराव पंदनवाड ,आकाश पाटील उंद्रीकर,विजय धनसुरे आदी उपस्थित होते.
▶️ उंद्री येथे *माजी आमदार हणमंतराव पा.बेटमोगरेकर* यांच्या मागणीवरून *नवीन डि.पी मंजुरीचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश* महावितरण ला ऊर्जामंत्री *ना.नितीनजी राऊत साहेब* यांनी दिले असता हे काम लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावे तसेच *उंद्री (प.दे) येथे दोन ए.बी.स्वीच* मंजूर करून बसवून देवून वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रश्न सोडवावा यासाठी महावितरणचे *जिल्हा मुख्य अभियंता व्हि.बी.पडळकर* यांना *मा.दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले .
▶️ *राजूर (बु) -उंद्री प.दे-व उंद्री पदे ते धनज या 8 कि.मी च्या रस्ता* मंजुरीसाठी *मा.अशोकराव चव्हाण साहेब* (सा.बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या कडे पाठपुरावा करावा अश्या आशयाचे निवेदन *मा.दिलीप पा.बेटमोगरेकर* यांच्याकडे करण्यात आले.