बेरळी येथील लाळ्या खुरकूत रोगाची लस व आधार बिल्ले मारणे संपन्न
जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सर्व जनावरांना बिल्ले मारून व लसिकरण या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद- डॉ.राहुल कांबळे
आज बेरळी येथे
राष्ट्रीय लाळ्या खुरकूत लसीकरण पशुरोग नियंत्रण लसीकरण कार्यक्रम मोहिमेअंतर्गत जिल्हाभरात राबवण्यात येत असून गावोगावी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन आपल्या पशुधनाला त्याच्या कानाला बिल्ला मारून घेऊन त्याचे लसीकरण करून घेणे चालू आहे
आपल्या गावामध्ये पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी येणार आहेत तर आपण पण आपल्या पशुधनाची सर्व माहिती अधिकाऱ्यास विचारुन आपले जनावरराची माहिती ऑनलाईन करुण घेत आहेत ह्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी गावांमध्ये चांगला प्रतिसाद दिला गावांमधील बिल्ले मारणे व लसीकरण शंभर टक्के झाले आहे असे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.राहुल कांबळे यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे उद्घाटक गावातील *युवा नेते मा. नागनाथ पाटील बेळीकर* *भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष मुखेड* माधवराव पाटील गुरुजी इंगोले मोहन पाटील वडजे आनंद पाटील इंगोले व्यकंटराव रावसाहेब पाटील उपसरपंच मा.सुरेश पाटील व जिल्हा चे
*पशुधन विमा अधिकारी*
*डॉ.राहुल कांबळे साहेब*
*नागनाथ पाटील बेळीकर*
*भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष मुखेड*
यांच्या हस्ते गाईंची पुजा करुन या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सुरुवात करण्यात आली
या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांना
सविस्तर मार्गदर्शन म्हणून जिल्हाचे पशुधन विमा अधिकारी
डॉ.राहुल कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले
जनावरांना बिल्ले मारण्याचे फायदे भविष्यात कोणत्याही जनावरांना गाय म्हैस बैल यांना बिल्ला नसल्यास खरेदी विक्री करता येणार नाही जनावरास नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून शॉट लागून मृत्यू झाल्यास त्यांना नुकसान भरपाई भेटणार नाही कोणत्याही बँकेकडून आपण कर्ज घेतल्यास विम्यासाठी हाच बिल्ला लागणार आहे तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना व पशुपालकांना विनंती आहे की आपल्या सर्व जनावरांना बिल्ले मारून घ्यावे व लसीकरण करून घ्यावे असे आव्हान
डॉ.राहुल कांबळे साहेबांनी केले आहे या कार्यक्रमाला गावातील
लसीकरणकर्ते कर्मचारी बालाजी ताळीकोटे सुधाकर राठोड इत्यादी उपस्थित होते