Home Breaking News आता रुग्ण वाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित

आता रुग्ण वाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित

190

आता रुग्ण वाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित

नांदेड,दि. ९: राजेश एन भांगे

जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे सुधारित भाडे दर आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निश्चीत करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दर आकारणी करावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे 9 जून 2020 रोजीचे आदेशान्वये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदराबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

भाडेदर निश्चित करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमध्ये मारुती व्हॅनसाठी 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 500 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 12 रुपये. टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीचे बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 550 रुपये भाडे प्रति कि.मी. भाडे 14 रुपये. टाटा 407 स्वराज माझदा आदीच्या साठयावर बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 650 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 17 रुपये. आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 1 हजार रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 24 रुपये याप्रमाणे राहतील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous article*जिल्ह्यात आज अखेर 38 हजार* *522 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज*
Next articleनागिन बारी ते रामनगर,चिंचवे रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.