Home Breaking News जिल्ह्यात जागतिक दृष्टी दिन साजरा

जिल्ह्यात जागतिक दृष्टी दिन साजरा

190

जिल्ह्यात जागतिक दृष्टी दिन साजरा

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. सामान्य जनतेमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, लहान मुलातील नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी 8 ऑक्टोबरला जागतिक दृष्टीदिन असून यासाठी ‘दृष्टिची आशा’ असे घोषवाक्य केंद्र शासनामार्फत देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.
वयस्कर नागरिकांमध्ये मोतिबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी आढळला जातो. ज्या रूग्णांना मधुमेहाचा आजार आहे, त्यांच्या दृष्टिपटलावर मधुमेहाचा परिणाम होतो. त्यांनी डायबेटिक रेटिनोपॅथीची आवश्यक तपासणी करून वेळीच उपचार केल्यास अंधत्व टाळता येते. राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सी.पी.आर. येथे मोफत तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे.
लहान मुलांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर याचा वापर वाढल्याने डोळा कोरडा होणे व दृष्टीदोष होणे याचे प्रमाण वाढत चालले आहे.
सद्य परिस्थितीत कोव्हिड-19 महामारीमुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेस याचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढत आहे. 20 मिनीटे काम केल्यानंतर पापणीची उघडझाप करणे आवश्यक आहे. तसेच 20 सेकंद डोळे बंद केल्यास डोळ्यात ओलावा निर्माण होतो. लहान मुलांमध्ये दृष्टीदोषाची तपासणी करून घेवून योग्य नंबरचा चष्मा वापरल्यास येणारे अंधत्व टाळता येते.

Previous article*कौळाणे,व-हाणेत ग्रामपंचायत चौकशीला आजपासून सुरुवात* *चौकशीत निष्पन्न होणार दडलेले रहस्य*
Next articleअजमीर सौंदाणेत गुणगौरव सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.