Home Breaking News *मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी ची* *घोषणा* *मराठा क्रांती ठोक मोर्चा*

*मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी ची* *घोषणा* *मराठा क्रांती ठोक मोर्चा*

193

*मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी ची* *घोषणा*
*मराठा क्रांती ठोक मोर्चा*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता नव्या आंदोलनाची घोषणा केलीय. मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी या नावाने हे नवे पर्व असणार आहे, अशी माहिती मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मराठा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिक्षण, पीएच.डी यामध्ये आरक्षण कसे मिळेल, याबाबचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी यापूर्वी मूक मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा अशी आंदोलन केली आहेत.
जर सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आता आमची लढाई सुरू करावी लागेल, असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी कशा प्रकारे करण्यात येईल, त्याची काय रणनिती असेल हे सध्या माध्यमातून जाहीर करणार नाही, असेही पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या लढाई संदर्भातील प्रत्येक गोष्ट माध्यमातून जाहीर करणार नाही. मात्र, वेळ आल्यावर कळेलच अशी भूमिका पाटील यांननी व्यक्त केली. सरकारने आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका घ्यावी. आता आरक्षणासाठी आरपारची लढाई असेल, सरकारने निर्णय घेतले नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

Previous article*भंडारा महामार्गाची दुरूस्ती* *आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ,*
Next article*‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’* *या मोहीमे जनजागृती करण्याचे* *आवाहन*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.