Home Breaking News केंद्रीय मंत्री गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री गडकरी यांना कोरोनाची लागण

348

केंद्रीय मंत्री गडकरी यांना कोरोनाची लागण

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं असून आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे.

Previous article*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*
Next articleबहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.