Home जालना जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर

जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर

218

आशाताई बच्छाव

1002009961.jpg

जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर
जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक २७/०९/२०२५ रोज शनिवार या दिवशी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली अती मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तसेच सर्वच नद्यांना महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे नदीकाठील गावातील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. तरी या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाने तात्काळ शेतकऱ्यापर्यंत मदत कशी पोहोचेल याची काळजी घ्यावी अशी विनंती शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच संपूर्ण जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा माल मातीमोल झालेला आहे त्यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, मिर्ची तसेच इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ म्हणुन घोषित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous articleसहकारी पतपेढी शिक्षण विभाग नांदेडच्या वतीने मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार.
Next articleपातुर्डा बु येथे “मन की बात” व “स्वदेशी अभियान” उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.