Home बुलढाणा पातुर्डा बु येथे “मन की बात” व “स्वदेशी अभियान” उत्साहात

पातुर्डा बु येथे “मन की बात” व “स्वदेशी अभियान” उत्साहात

112

आशाताई बच्छाव

1002009973.jpg

पातुर्डा बु येथे “मन की बात” व “स्वदेशी अभियान” उत्साहात
✍🏻स्वप्निल देशमुख
पातुर्डा बु (ता. संग्रामपूर) :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुथ क्रमांक 227 व 229 मिळून दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

सायंकाळी “प्रत्येक घरी स्वदेशी – घरोघरी स्वदेशी” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “आत्मनिर्भर भारत” या पक्षाच्या धोरणाचा पुनरुच्चार करत, गावकऱ्यांकडून स्वदेशी संकल्प पत्र भरून घेण्याची सुरुवात झाली. स्वदेशी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा संकल्प करण्यात आला. गावातील दुकानदारांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान परिसरातील महिलांची लाडकी बहीण योजना व आयुष्मान भारत कार्ड यांची मोफत केवायसी करण्यात आली. तसेच मतदार यादीतील दुरुस्त्या व नवमतदार नोंदणीही करण्यात आली. या सर्व उपक्रमांना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते माजी सरपंच उत्तमराव तायडे, ज्येष्ठ नेते रमणजी सेवक, तालुका चिटणीस ज्ञानेश्वर तायडे, युवा नेतृत्व शुभम म्हसाळ, युवा पत्रकार आकाश पालीवाल, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुमनबाई तायडे तसेच प्रतिष्ठीत नागरिक रामेश्वर वानखडे, रमेश धर्माळ यांच्यासह कारसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या वेळी मोहन तायडे, मनोहर तायडे, सारंगधर तायडे, संजय चांडक, भानुदास तायडे, गजानन तायडे, सुनील तायडे, संतोष तायडे, विश्वंभर तायडे, अरविंद तायडे, आशिष तायडे, पवन भारत तायडे, आदित्य तायडे, निलेश तायडे, गजानन राजनकर, संजय राहाटे, रामेश्वर निमकर्डे, प्रकाश बोंबटकार, पंकज निमकर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर
Next articleवानखेड: नवरात्रोत्सवात भाविकांची धामधूम साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जगदंबा देवी संस्थानात उत्साहवर्धक कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.