Home नांदेड सहकारी पतपेढी शिक्षण विभाग नांदेडच्या वतीने मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार.

सहकारी पतपेढी शिक्षण विभाग नांदेडच्या वतीने मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार.

116

आशाताई बच्छाव

1002008223.jpg

सहकारी पतपेढी शिक्षण विभाग नांदेडच्या वतीने
मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 28 –
सहकारी पतपेढी शिक्षण नांदेडची 96 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न झाली. यावेळी सहकारी पतपेढीच्या वतीने मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण साहेब तर प्रमुख पाहुणे माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, जि.प. सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देविदास बसवदे यांची उपस्थिती होती.
क्रियाशील, विद्यार्थी तळमळ, विद्यार्थीप्रिय, शिक्षकप्रिय, प्रशासनप्रिय, मित्र मंडळीच्या गराड्यातील व्यक्तिमत्त्व मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांना महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे आदर्श महाराष्ट्र शिक्षकरत्न नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यासंदर्भाने पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी अशोकराव पवळे, शिक्षणविस्तार अधिकारी ढगे, काळे, पतपेढी अध्यक्ष दत्तराम (बंडू) पाटील भोसले, उपाध्यक्षा श्रीमती जयश्री देशमुख, सचिव बाबुराव कैलासे, माजी अध्यक्ष थडके, अशोक पाटील मारतळकर, संचालक दिलीपराव देवकांबळे, बाळासाहेब लोणे, संजय पाटील अंबुरे, माणिकराव कदम, श्रीमती संगीता माळगे-फसमले, हनमंत जगपेटे, प्रल्हाद राठोड, संजय कोठाळे, जयवंत काळे, संतोष अंबुलगेकर, अण्णाराव गुमनर, चंद्रकांत दामेकर, सोनकांबळे, बेग, हनमंते, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, संतोष अंबुलगेकर, माजी अध्यक्ष अशोकराव बावणे, दत्तप्रसाद पांडागळे, दिगांबर पा. कुर्‍हे, रवी ढगे, विठ्ठल मुखेडकर, संजय मानकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच पतपेढी कर्माचारी देवापूरे पी.बी., सोळंके बी.जी., जाधव, ढगे एम.एम, मुपडे व्ही.के., चिंतावार, पाटील, जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक मित्र मंडळी, समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article…..प्रेरणादायी लेख…….. शहीद ए आजम भगत सिंग*: *युवापिढीसाठी प्रेरणास्त्रोत
Next articleजालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा जिल्ह्यात पावसाचा कहर नद्यांना महापूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.