Home जालना आदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत

आदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत

163

आशाताई बच्छाव

1001922845.jpg

आदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना,दि.4 (जिमाका/दिलीप बोंडे जिल्हा प्रतिनिधी): केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदि कर्मयोगी अभियान योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील 24 गावातील आदिवासी समाजाच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान बैठकी दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, उप मुख्य कार्यकारी पंचायत उदयसिंग राजपूत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आर. डी. तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता एल. बी. बारगिरे, प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना सदर योजनेंतर्गत पुढील प्रमाणे सामुहिक विकासाच्या योजना राबविणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. यामध्ये आवास योजना, जल अपुर्ती साधने विहिरी, हॅन्डपंप, ट्युबवेल, पाण्याच्या टाक्या, जलाशये, नहरे इत्यादी, आरोग्य व पोषण, शिक्षण, रस्ते व दळणवळण, वीजेची जोडणी, सामुदायीक व धार्मिक सुविधा मध्ये मंदीर, मस्जिद, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे विकास, दूरसंचार साधनामध्ये टपालघर, टेलीफोन बुथ, मोबाईल टॉवर, रेडीयो सूचना बोर्ड, बाजारपेठ व व्यापार साधने, स्वच्छतागृहे, सामुदायीक शौचालये, मलनिस्सारण योजना, कृषि सहायता मध्ये पशुशाला, अन्न गोदाम, सिंचन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Previous articleतुळजाभवानी नगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
Next articleउरळीकांचन..वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील तुमच्या बुध्दीकौशल्यातुन अनेकजण प्रेरणा घेतील…महंत.श्री.गोपालव्यास कपाटे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.