आशाताई बच्छाव
उरळीकांचन..वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील तुमच्या बुध्दीकौशल्यातुन अनेकजण प्रेरणा घेतील…महंत.श्री.गोपालव्यास कपाटे पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ –महानुभाव..उरळीकांचन पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील यांनी आपल्या बुध्दीकौशल्याने व लोकप्रतिनिधी सरपंच सौ ॠतुजाताई अजिंक्य कांचन व सहकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून उरळीकांचन शहर, इलाईट चौक, तळवाडी चौक ह्या ठीकाणी होणारी सततची वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी आपल्या बुध्दीचातुर्याने प्रयत्न केले व अनेक वर्षांपासून भेडसावत असणारी वहातूक कोंडीची समस्या हा विषय सर्वांशी संवाद व समन्वय साधून सोडवला शनिवार रविवार असो की सणावाराचे दीवस असो की इतर वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात वहातूक कोंडीला सामोरे जावे लागत असे अनेक वेळेस अपघात झालेत त्यामधे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला या सततच्या भेडसावणाऱ्या बाबीवर शंकरराव पाटील व त्यांचे सहकारी यांनी यावर उत्तम पर्याय शोधून त्यात त्यांनी यश मिळवून दीले पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अनेकांना जिवदानच दीले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही असे मत महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले ह्या समस्याचे निवारण केल्या बद्दल वाहनचालक, प्रवासी,व नागरिकांकडून व समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे…






