Home नाशिक कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा

कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा

680

आशाताई बच्छाव

1001645121.jpg

कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा
निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

हजारो पायी दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करत असून वारकरी अतिशय उत्साहाने व आनंदामध्ये या दिंड्यांमध्ये भजन ,सत्संग, फुगडी ,प्रवचन ,कीर्तन यांच्या माध्यमातून नामस्मरण व पांडुरंगाचा दर्शनाचा ध्यास घेत पुढे पुढे सरकत आहे. पायी वारी करत असताना अनेक अनुभव वारकऱ्यांना येत असतात.वारीमध्ये भोजन हे तर महत्वाचे आहे. भोजनासाठी असणाऱ्या सेवेकरी त्यांची नावे- आचारी भावडू डबाळे ,संजय गव्हाणे, नितीन बेडंकुळे ,योगेश पवार, छबु गोतरणे, शांताबाई सहायके, गीताबाई कडाळे व इतर सेवेकरी पण आहे जसे जेवण वाढणे कोणाला काही पाहिजे असले तर आणून देणे रस्त्याने सर्व एका रांगेत चालवणे ही पण खूप मोठी सेवा असते .त्यांची नावे पुढील प्रमाणे ज्ञानेश्वर भोज ,भगवान मोगरे, पंढरी नाना खालकर ,शांताराम खालकर, वसंतराव भंडारे, रामनाथ भंडारे ,भाऊसाहेब भंडारे ,ज्ञानेश्वर भंडारे, किरण भंडारे ,गोपाळ काळे, अनिल भंडारे ,किशोर गटकळ ,अरुण मोगरे, सदू खालकर ,रमेश खालकर, दत्तू घुमरे ,सदु गटकळ इ.हे सगळे महत्त्वाचे सेवेकरी आहे दिंडीमध्ये सर्वच वारकरी पन्नाशीच्या पुढचे असतात. आमच्या दिंडीत 190 ते 200 वारकरी आहे .त्यात फक्त दहा जण 25 ते 35 वर्षाचे आहे .त्यातील एक मुलगा त्याचे नाव आकाश सोनी तो सहा महिने जहाजावर असतो वारीच्या चार दिवस अगोदर त्याला सुट्टी मिळाली .तीनच दिवस घरी आणि चौथ्या दिवशी वारीत आमच्याबरोबर सामील झाला .त्याची पत्नी व एक मुलगा तो तीनच वर्षाचा आहे तरी कुटुंबाचा मोह सोडून पंढरपूरच्या वारीसाठी आला. दिंडीतल्या वारकऱ्यांची सेवा करतो ,जी व्यक्ती कुटुंबापासून सहा महिने दूर राहते! आल्यानंतर दोन-तीन दिवसात लगेच पंधरा दिवसाच्या वारीसाठी निघते !अशा तरुण मुलांचा आदर्श इतर तरुण मुलांनी घेतला पाहिजे. अशी मुले आत्तापासून दिंडीत आली तर आपली ही परंपरा अशीच कायम चालू राहील. दिंडी मध्ये भाऊसाहेब तात्या भंडारे हे वारकऱ्यांची अगदी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात. प्रत्येक वारकऱ्यांची विचारपूस करत असतात.पांडुरंग कोणाच्या तरी रुपाने आपली काळजी घेतो असे वाटते.आज दुपारचे अन्नदान आमदार दिलीप (काका) बनकर यांच्या तर्फे होते.

सौ कमलताई गोकुळ गायकवाड म्हसरूळ
नाशिक जिल्हा उपाध्यक्ष महिला वारकरी मंच महाराष्ट्र राज्य