Home वाशिम शिक्षकेतर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल काळे

शिक्षकेतर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल काळे

255

आशाताई बच्छाव

1001645097.jpg

शिक्षकेतर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल काळे
वाशीम,(दि२८ गोपाल तिवारी ब्युरो चीफ) महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल काळे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या नुतन जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी आज वाशीम येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात सभा शिक्षकेतर संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली. या सभेत श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनचे कर्मचारी प्रफुल्ल काळे यांची संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना प्रफुल्ल काळे यांनी मी अविनाश पसारकर व विनायक उज्जैनकर यांच्यासारख्या अभ्यासु व आक्रमक नेतृत्वाखाली तयार झालेला कार्यकर्ता असून जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचार्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Previous articleहरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा तरुण पिढीने आदर्श घ्यावा -एस .राठोड
Next articleकशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.