आशाताई बच्छाव
प्राचार्य डाॅ आदिनाथ मोरे व प्रा.सुनील गायकर मुंबई येथे आयपीएस अधिकारी किरण बेदी व पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते ‘एक्सलन्स अवॉर्ड’ ने सन्मानित होणार
९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे शानदार वितरण सोहळा
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट ऑलंपियाड च्या वतीने दिला जाणारा एक्सलन्स अवार्ड २०२५ /२६ हा मानाचा पुरस्कार लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे आणि उच्च माध्यमिक विभागाचे ऑलंपियाड परीक्षा समन्वयक प्रा.सुनिल गायकर यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे आयपीएस ऑफिसर डॉ. किरण बेदी व पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये ऑलंपियाड परीक्षांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांचे ज्ञान, स्पर्धा व आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्राचार्य डॉ.मोरे व प्रा. गायकर यांनी घेतलेल्या विशेष पुढाकाराची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती ऑलंपियाड संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर,चेअरमन प्रकाश पाटील, खजिनदार अनिल डागा, तसेच संचालक चंद्रशेखर होळकर, हसमुख पटेल, चंद्रशेखर भावसार, योगेश पाटील, सचिन मालपाणी, संदीप होळकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी प्राचार्य डॉ मोरे व प्रा. गायकर यांचे अभिनंदन केले आहे.






