आशाताई बच्छाव
पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ –प्रतिष्ठित महंती, प.पु.प.म.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव मिळाल्याने प.पु.श्री रविराजदादा पंजाबी महानुभाव यांचा उरळीकांचनच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार….प.पु.रविराजदादा पंजाबी महानुभाव ऊरळीकांचन यांना प्रतिष्ठित महंती प.पु.प.म.श्री गोपालव्यास कपाटे ही महंती प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने त्यांचा ऊरळीकांचनच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन, महात्मा गांधी सर्वोदय संघ, पद्मश्री डाॅ मनिभाई देसाई महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री.के.डी.कांचन (बापू) उरळीकांचनचे P.S.I पोलीस इन्स्पेक्टर मा.श्री.शंकरराव पाटील, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे सचिव मा.श्री.रंगनाथ आप्पा कड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी के.डी.बापू म्हणाले की प.पु.रविराजदादांना जी महंती प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ती त्यांच्या (आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, इत्यादी) क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याची पावती आहे.ह्या प्रतिष्ठित महंतीमुळे उरळीकांचनच्या वैभवशाली इतिहासात भर पडली आहे असे गौरवोद्गार के.डी. बापूंनी काढले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.






