Home जालना पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

100

आशाताई बच्छाव

1001642514.jpg

पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी
पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभारावर संशय
आस्था हॉस्पीटलच्या डॉक्टरांकडून पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी जालना जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारण्यास काहीही न ऐकता चक्क नकार दिल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारभारावर संशय व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया पीसीएम जालनाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, एखाद्या हॉस्पीटलच्या डॉक्टरांची तक्रार ऐकून घेण्यासाठी जर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वेळ नसेल याचा अर्थ हॉस्पीटलचे डॉक्टर आणि त्यांच्यात काही हितसंबंध असण्याी दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारभाराचीही चौकशी करावी अशी मागणी यावेळी श्री शेळके यांनी केली.

चौकशीसाठी शिष्टमंडळ नेमा
पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईच्यामागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने त्यांना प्रकरणाचा व्हिडीओ दाखवला व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. यावर श्री महाडीक यांनी कारवाईचे आश्‍वासन देत जिल्हा शल्य चिकित्सकांना चौकशीसाठी कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकारांकारांचे या संदर्भानेच निवेदन घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे प्रकरण वर्ग न करता संपूर्ण प्रकरणासाठी एखादी समिती नेमूण तपास करावा, अशी मागणी पीसीएम जालना जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.